‘सीमेपलिकडे सुरू असलेल्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आत्मनिर्भर’

‘सीमेपलिकडे सुरू असलेल्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आत्मनिर्भर’

pralhad joshi and modi

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना तालिबानने अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवला आहे. ते आता तिथे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अफगणिस्तानचे नेते देश सोडून पळून गेल्यानंतर तेथील जनता आता भयभीत झाली आहे. दरम्यान, तालिबानच्या समर्थनाथ अनेक देश उतरले असून चीन आणि रशिया यासारख्या दिग्गज राष्ट्रांनी तालिबान्यांचे जाहीर कौतूक केले आहे. तर दुसरीकडे भारतीय नेत्यांनी देखील या घडामोडीवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान आता मोडी सरकारमधील भारताचे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘देशाच्या सीमेपलिकडे सुरू असलेल्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आत्मनिर्भर आहे. दहशतवादाविरोधात भारत झिरो टोलरन्स नितीचं पालन करतो. ते लोक इतर देशांमध्ये अडचणी निर्माण करण्याचं काम करतील, पण मोदी सरकारनं गेल्या सात वर्षात देशात झिरो टोलरन्स नितीवर जोर दिला आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं कोणतंच कारण नाही.’ असे स्पष्ट मत प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले आहे.

फेसुबकने तालिबानविरोधात मोठी कारवाई केली आहे. तालिबानच्या समर्थनार्थ जी काही फेसबुक अकाउंट्स असतील ती सर्व अकाउंट्स फेसबुकने बंद केली असल्याची माहिती फेसबुककडून देण्यात आली आहेत. ‘आमच्या धोरणांनुसार, दहशतवादी संघटनेला आमच्या प्लॅटफॉर्ववर स्थान दिले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तालिबान किंवा त्याच्याशी संबंधित कोणतेही अकाऊंट, पोस्ट फेसबुकवर दाखवली जाणार नाही’, असे फेसबुकने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये म्हंटले आहे. अफगाणी भाषा समजण्यासाठी काही अफगाणी भाषा तज्ञांची नियुक्तीही केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या