अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेकडून सी.ए.ए.समर्थनार्थ पुण्यात ‘भारत सुरक्षा यात्रा’

abvp-thumb

टीम महाराष्ट्र देशा  : केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या स्वागत आणि समर्थनार्थ ‘भारत सुरक्षा यात्रा’ या ३०० फुट तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ जानेवारी रोजी सकाळी मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड येथून ही यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेच्या उदघाटन प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण उपस्थित राहणार आहेत. यात्रेचा समारोप मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथे होईल. .

समारोपास माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी हे ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ या विषयावर विद्यार्थांना संबोधित करतील. अभाविप पुणे महानगराचे कार्यकर्ते पुणे शहरातील प्रत्येक कॉलेज वर जाऊन नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती करत आहेत तसेच भारत सुरक्षा यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहेत. त्यामुळे या यात्रेमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील.

Loading...

भारत सरकार ने लागू केलेला नागरिकत्व संशोधन कायदा हा धार्मिक प्रतारणा झालेल्या लोकांच्या हिताचा कायदा आहे. पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्थान या देशामध्ये असलेल्या अल्पसंख्याक लोकांवर होणाऱ्या अत्याचारविरुद्ध भारत सरकारने घेतलेला हा सकारात्मक निर्णय आहे. अशी भूमिका अभाविपने ठेवली आहे. या तिरंगा पदयात्रे नंतर पुणे शहरातील १०० महाविद्यालयात CAA समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिम राबवणार आहे. त्यासाठी महाविद्यालय शाखा विद्यार्थी व प्राध्यापक यांना भेटून CAA चे महत्त्व सांगणार आहे. तसेच पुणे शहरातील विविध वस्ती भागात जाऊन देखील स्वाक्षरी मोहीम व जनजागृती पुणे महानगराच्या वतीने करण्यात येणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की