प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह : संचलनासाठी दिल्ली सज्ज

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात आज 71 वा प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. यानिमित्त राजधानी दिल्लीतील दरवर्षीप्रमाणे राजपथावर मोठ्या संचलनाच आयोजन करण्यात आलं आहे. यंदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर मेसियास बोल्सोनारो प्रमुख अतिथी म्हणून सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या सुरक्षा दलांच्या सलामीचा स्वीकार करतील. ज्यानंतर देशात असणाऱ्या विविध राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या मंत्रालयांची झलक सादर केली जाणार आहे.

Loading...

दरवर्षीप्रमाणेच यंदाही दिल्लीतील राजपथ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी आणि थरारक प्रात्यक्षिकांसाठी सज्ज झालं आहे. राजपथावर या दिवशी देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीची झलक एकाच वेळी पाहता येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाला भव्यपणासोबतच दिल्लीला मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली आहे. या कार्यक्रमावर हजारो पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांची करडी नजर असणार आहे. राजपथवर सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती दर्शविणार्या 22 चित्ररथांपैकी 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील तर 6 चित्ररथ विविध मंत्रालये आणि विभागांचे असतील.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की