fbpx

सार्क चित्रपट महोत्सवात भारताचा डंका, सर्वोत्कृष्ठ चित्रपटासह सहा पारितोषिकं

टीम महाराष्ट्र देशा- श्रीलंकेतल्या कोलंबो इथे झालेल्या नवव्या सार्क चित्रपट महोत्सवात भारताला सहा पारितोषिकं मिळाली आहेत. यात, नगरकीर्तन या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट संदेशांमधून ही माहिती दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक गांगुली यांना उत्कृष्ट दिग्दर्शक तर रिद्धीसेन यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे.