‘कोरोनाची चुकीची माहिती पसरवण्यात भारत पहिल्या स्थानावर’, आंतरराष्ट्रीय जर्नलचा दावा

INDIA

नवी दिल्ली: जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने संपूर्ण जगाला एक क्षण थांबवून ठेवले. मात्र याच कोरोनाबद्दल समाज माध्यमावर चुकीची माहिती पसरवण्यात भारत देश अग्रस्थानी असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय जर्नलने केला आहे.

देशातील इंटरनेट पेनेट्रेशन रेट, युजर्सची इंटरनेट साक्षरतेची कमतरता आणि सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे हे घडल्याचं समोर आले आहे. दरम्यान ‘१३८ देशांमधील कोरोनासंबंधी चुकीच्या माहितीची व्यापकता आणि स्त्रोत विश्लेषण’ या सर्व्हेनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. याची माहिती सेजच्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन अँड इन्स्टिट्यूशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे.

यामध्ये चुकीच्या माहितीच्या ९,६५७ गोष्टींचे विश्लेषण करण्यात आले असून यासंबंधी ९४ संस्थांनी त्याचे फॅक्टचेक केले आहे. यामध्ये भारताने १८.०७ टक्के चुकीची माहिती समाज माध्यमावर पसरवली आहे. तर भारतनंतर अनुक्रमे अमेरिका ९.७४ टक्के, ब्राझील ८.५७ टक्के आणि स्पेन ८.०३ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. चुकीच्या माहितीमुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या