भुकेच्या तीव्रतेत भारत ‘या’ क्रमांकावर तर १० रुपयाच्या थाळीत भूक भागणार का

टीम महाराष्ट्र देशा : नुकत्याच झालेल्या २०१९ च्या जागतिक भूक निर्देशांकानुसार भारताला भुकेची पातळी गंभीर असलेला देशांमध्ये वर्गीकृत करण्यात आले असल्याची धक्कादाय बाब समोर आली आहे. भुकेच्या तीव्रतेत ११७ देशांमध्ये भारताचा १०२ क्रमांकावर आहे. तर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक हा देश सर्वाधिक भुकेच्या समस्येत ११७ व्या क्रमांकावर आहे. कन्सर्न वर्ल्डवाईड हि आयरिश संस्था आणि जर्मनच्या वेल्ट हंगर हिल्फी या संथानी हा अहवाल तयार केला आहे.

जागतिक भूक निर्देशांक जगभरातील भूक आणि कुपोषणाच्या पातळ्या मोजतो. यात एक कुपोषण, दुसरा लहान मुलांची वाढ खुंटणे, तिसरा मुलांच्या अवयवांची झीज आणि चौथा बालमृत्यू. असे निर्देशांकासाठीचे चार घटक आहेत. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून तिथली परिस्थितीही गंभीर बनत चालली आहे. भारतात मुलांमध्ये अवयवांची झीज होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २०.८% आहे. मुलांची वाढ खुंटण्याचे प्रमाण ३७.९% आहे.

मागच्या काही वर्षांमध्ये भारताच्या कामगिरीत थोडी थोडी सुधारणा झाली. मात्र अजूनही उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य आणि मुलांची वाढ व विकास यांच्यावर विपरित परिणाम होतो. तर भारताच्या तुलनेत बांगलादेश आणि नेपाळ या शेजाऱ्यांची परिस्थिती बरीच चांगली आहे. भारताच्या १०२ व्या क्रमांकावर असण्याचा अर्थ म्हणजे फक्त पंधरा देश भारतापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये आहेत.

यावरून सरकार विकासाचे कितीही दावे करत असले तरी देशाची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक मंदीचा सामना करत आहे. तरीही सत्तेसाठी सरकार १० रुपयात सकस जेवण देण्याचे आश्वासन देत आहे तर विरोधी पक्ष गरिबी हटाव चा नारा ही नित्याचीच बाब झाली आहे. विकासाच्या नावाखाली अत्यंत सुमार कामगिरी झाली असून दोन वेळेच्या पोटभर अन्नासाठीसुद्धा लोकांना संघर्ष करावा लागत असल्याचे या निर्देशांकावरून पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :