fbpx

भारतापुढे पाकिस्तानचा शांततेचा प्रस्ताव

टीम महाराष्ट्र देशा – ‘जंग मे किसी की जीत नही होती किसी की हार नही होती सिर्फ इंसानियत की हार होती है’. आम्हाला युद्ध नकोय. दोन्हीकडच्या लोकांना शांततेत जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांच्या वतीने शांततेने चर्चेचा प्रस्ताव भारतापुढे मांडत आहोत. असं पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका पत्रकार परिषदेत म्हणत भारतपुढे शांततेचा प्रस्ताव मांडला आहे.

‘आज आम्ही स्वसंरक्षणात हल्ले केले आहेत. जर आमच्यावर युद्ध लादलं गेलं तर तो आमचा नाइलाज असेल,’ असं गफूर म्हणाले.

‘युद्ध झालं तर फक्त दोन देशच नाही तर या संपूर्ण भागात आणि जगभरात परिणाम होतील. त्यावर ते कसा विचार करतात यावर पुढची वाटचाल अवलंबून आहे,’ असही त्यांनी संगितलं.