पिंक बॉल टेस्ट साठी टीम इंडिया सज्ज, ‘हे’ अकरा शिलेदार करणार इंग्रजांची बत्ती गुल !

team india

अहमदाबाद : चेन्नईमध्ये इंग्रजांना पाणी पाजल्यानंतर विराट सेना आता अहमदाबाद मधील नव्या कोऱ्या मोटेरा स्टेडियममध्ये इंग्रजांना धूळ चरण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

हा कसोटी सामना डे-नाईट असणार आहे. ही मॅच गुलाबी चेंडूने खळण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात दुसऱ्या कसोटी सामना झाल्यानंतर बीसीसीआयने मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. एकूण 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवचे संघात पुनरागमन झालं आहे.

या सामन्यात भारताचा अंतिम 11 जणांचा संघ कसा असेल? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. चेन्नई कसोटी जिंकवणारा भारताचा संघ संतुलित वाटत असला तरी तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि संघाचे प्रशिक्षक संघात काही बदल करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आलेला भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्याद्वारे कमबॅक करेल, असं बोललं जात आहे. त्यासाठी मोहम्मद सिराजला या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. इशांत शर्मा या सामन्यातही खेळणार आहे हे निश्चित आहे.

मोटेराची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने भारतीय संघ या सामन्यात दोन किंवा तीन फिरकीपटूंना संधी दिली जाऊ शकते. दुसऱ्या कसोटीत रवीचंद्रन अश्विनने पहिल्या डावात पाच गडी बाद केले होते, तर अक्षर पटेलने दुसऱ्या डावात 5 विकेट मिळवल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात हे दोघेही संघात दिसतील. तर कुलदीप यादवला या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते.

कुलदीप यादवऐवजी हार्दिंक पंड्याला या सामन्यात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. जर तसे झाल्यास हार्दिक पांड्याला गोलंदाजीदेखील करावी लागले. पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक पंड्याने गेल्या काही महिन्यात खूपच कमी सामन्यात गोलंदाजी केली आहे.

अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह

महत्वाच्या बातम्या