‘भारत-पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान’

टीम महाराष्ट्र देशा – माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते, अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी यांना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली असून पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान ठरेल, असे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर इम्रान खान यांनी दिलेली प्रतिक्रिया

भारत- पाकिस्तानमध्ये राजकीय मतभेद आहे. पण दोन्ही देशांना सीमेवर शांतता हवी आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करणे हीच वाजपेयींसाठी खरी श्रद्धांजली ठरेल.अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय उपखंडातील आदरणीय नेते होते. भारत- पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. वाजपेयींच्या निधनाने दक्षिण आशियातील राजकारणात मोठी पोकळी झाली आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतले अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंंदर्शन