भारत-पाकिस्तान सामना भारतात आयोजित करणे खूप कठीण : सौरव गांगुली

भारत-पाकिस्तान सामना भारतात आयोजित करणे खूप कठीण : सौरव गांगुली

ganguli

नवी दिल्ली : सौरव गांगुली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे की, भारतात भारत-पाक सामना आयोजित करणे खूप कठीण काम आहे. गांगुली म्हणाले की, यामागील सर्वात मोठे कारण तिकिटांची मागणी आहे. अशा परिस्थितीत युएईमध्ये सामने होणे तुलनेने सोपे असल्याचे वाटते. भारत आणि पाकिस्तान रविवारी पासून स्पर्धेला सुरुवात करत आहेत. सुपर 12 च्या चौथ्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबईत होणार आहे.

विराट कोहली टी -20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ असेल. यासोबतच कोहली आयसीसीचे पहिले विजेतेपद जिंकण्याचाही प्रयत्न करेल. या विश्वचषकानंतर या फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे भारतीय कर्णधाराने आधीच जाहीर केले आहे.

गांगुली म्हणाला, ‘वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान परस्पर सामन्याने सुरुवात करण्याची ही पहिली वेळ नाही. 2015 मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता. कदाचित 2019 मध्ये असे झाले नसेल, चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने झाली. त्यानंतर आम्ही ओव्हलवर अंतिम सामना खेळलो. प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला, ‘हे होत राहते कारण लोकांना या सामन्यात खूप रस आहे. त्यांचे आयोजन करणे कठीण नाही. जेव्हा मी खेळायचो तेव्हा मला कधीच वाटले नाही की हा सामना कठीण आहे. गांगुली म्हणाला, ‘भारत पाकिस्तान सामना भारतात आयोजित करणे अधिक कठीण आहे. लोक सतत तिकीट मागत असतात. या सामन्याबद्दल लोकांचा दृष्टीकोन वेगळा आहे. यूएईमध्ये असे नाही.

महत्वाच्या बातम्या