पुण्यातील चित्रपटगृहात अनुभवता येणार भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना!

पुण्यातील चित्रपटगृहात अनुभवता येणार भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना!

india pakisthan

दुबई : जगभरातील क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपली आहे. आज रविवारी टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या शानदार सामन्याने दोन्ही संघ त्यांच्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहेत. या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

आज आयसीसी टी-२० विश्वचषक केवळ भारत आणि पाकिस्तानसाठीच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. आता हा सामना सुरू होण्यास फक्त काही तास शिल्लक आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाणार आहे.

दरम्यान, करोना काळात बंद असलेले चित्रपटगृहे आता पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. तर भारत-पाकिस्तान हाय होल्टेज सामना आता थेट चित्रपगृहात दाखवणार असल्याचे पीव्हीआर सिनेमा कंपनीने सांगितले आहे.

पीव्हीआर सिनेमा कंपनीने नुकताच याबाबत आयसीसीशी करार केला असून त्दिल्ली, मुंबई, अहमदाबाद व पुणे या चार शहरांमधील पीव्हीआर चित्रपटगृहात भारताच्या सर्व सामन्यांसह उपांत्य लढती व अंतिम लढतींचा थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे. देशातील जवळपास 76 पीव्हीआर चित्रपटगृहात सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

महत्वाच्या बातम्या