fbpx

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने पुन्हा सुरु व्हावेत- अजित वाडेकर

ajit wadekar

टीम महाराष्ट्र देशा- जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजून ताज्या असतानाच येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
पाकिस्तानकडून पोसला जाणारा दहशतवाद, सीमेपलीकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन यामुळे मागील काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारे क्रिकेटचे सामने बंद करण्याचा निर्णय बीसीसीआयनेआणि सरकारने घेतला आहे. दहशतवादाला पाकिस्तानकडून दिलं जात असणारं अभय हे सर्वश्रुत असताना भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

sunjwan attack

नेमकं काय म्हणाले वाडेकर
आजच्या क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघ सर्वोत्तम बनला आहे. आज आय. पी. एल.सारख्या स्पर्धा क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. चांगल्या नवीन खेळाडूंना या स्पर्धांतून संधी मिळते. मोठ्या खेळाडूंबरोबर खेळल्याने नवीन खेळाडूंना अनुभव मिळतो. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना भारताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्रयस्त ठिकाणी खेळून पाकिस्तानला हरविले तर आनंद होतो; त्यामुळे परदेशात कुठेही भारत व पाकिस्तान यांच्यात सामने व्हावेत. त्यांना सर्वाधिक क्रिकेटप्रेमींची गर्दी होते व ते विविध चित्रवाहिन्यांवर पाहिलेही जातात.