केएल राहुलचा असाही पराक्रम !

पल्लेकेल : भारताचा सलामीवीर केएल राहुलने श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना आज मोठा पराक्रम केला आहे. केएल राहुलने आज श्रीलंकेविरुद्ध खेळताना कारकिर्दीतील ९वे कसोटी अर्धशतक केले आहे.या अर्धशतकाबरोबर केएल राहुलने कसोटीमध्ये सलग ७ डावात अर्धशतकी खेळी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील ६वा कसोटीपटू ठरला आहे. याशिवाय भारताकडून सार्वधिक सलग अर्धशतके करण्याचा विक्रम राहुलने आपल्या नावे केला आहे.

भारताकडून गुंडप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविड यांनी सहा सलग अर्धशतकं ठोकली आहेत. केएल राहुलने आता या दिग्गजांना मागे टाकले आहे.

सलग सात अर्धशतके करणारे खेळाडू
एव्हर्टोन विक्स
अँडी फ्लॉवर
शिवनारायण चंद्रपॉल
कुमार संगकारा
ख्रिस रोजर्स
केएल राहुल

भारताकडून सार्वधिक सलग अर्धशतके खेळाडू
७ केएल राहुल
६ गुंडप्पा विश्वनाथ
६ राहुल द्रविड