भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका : भारताची समाधानकारक धावसंख्या

भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका : भारताची समाधानकारक धावसंख्या

india vs newzealand

कानपूर: मुंबईकर श्रेयस अय्यरने कसोटी पदार्पण करत आक्रमक खेळी केली. श्रेयसने १३६ चेंडूंचा सामना करीत सात चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ७५ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी पहिल्या डावात ४ बाद २५८ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.

भारताची ३ बाद १०६ धावसंख्या झाली असताना चेतेश्वर पुजारा (८८ चेंडूंत २६ धावा) बाद झाला आणि पदार्पणवीर श्रेयस मैदानावर आला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला (६५ चेंडूंत ३३ धावा) कायले जेमिसनने (१५.२-६-४७-३) माघारी पाठवले. ४ बाद १४५ अशा स्थितीत रहाणे बाद झाल्यानंतर श्रेयसने भारताचा डाव सावरला. तर कर्णधार रहाणेने अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या (१०० चेंडूंत ५०* धावा) साथीने पाचव्या गडय़ासाठी ११३ धावा केल्या. जडेजाने कारकीर्दीतील १७ वे अर्धशतक करत सहा चौकार मारले.

त्याआधी, सकाळच्या सत्रात रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मग जेमिसनने मयांक अगरवालला (१३) बाद करीत भारताची सलामीची भागीदारी तोडली. पुजाराच्या साथीने दुसऱ्या गडय़ासाठी ६१ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. दरम्यान माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी सामन्याआधी भारतीय संघाची टोपी श्रेयसला बहाल करताना खास खेळाडू अशा शब्दांत त्याला गौरवले. श्रेयस हा कसोटी पदार्पण करणारा भारताचा ३०२वा खेळाडू ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या: