कानपूर : पाचव्या दिवसातील अखेरच्या नऊ षटकांत विजयासाठी आवश्यक एक बळी मिळवण्यात भारतीय (India)गोलंदाज अपयशी ठरल्याने न्यूझीलंडने (New Zealand)पहिला कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. भारताने दिलेल्या २८४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ९ बाद १६५ धावाच केल्या.
परंतु फिरकीला पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडचे फलंदाज टिकून राहिले. दरम्यान उभय संघांतील दुसरी कसोटी शुक्रवार, ३ डिसेंबरपासून मुंबईत खेळवण्यात येणार आहे. टॉम लॅथम (५२) आणि विल्यम समरव्हिले (३६) यांनी पहिल्या सत्रात अप्रतिम फलंदाजी करत भारताला एकही बळी मिळू दिला नाही. दुसऱ्या सत्रातील पहिल्याच चेंडूवर उमेश यादवने समरव्हिलेला बाद करून ही जोडी फोडली. समरव्हिलेने दुसऱ्या गडय़ासाठी लॅथमसह ७६ धावांची भर घातली.
दरम्यान कर्णधार केन विल्यम्सनने लॅथमच्या साथीने न्यूझीलंडला बळकटी दिली. परंतु सलग दुसरे अर्धशतक झळकावल्यावर लॅथम रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला, तर रवींद्र जडेजाने रॉस टेलरला (२) पायचीत करत न्यूझीलंडची ४ बाद १२५ अशी अवस्था केली. मात्र अखेरच्या सत्रात सहा बळींची गरज असताना जडेजाने विल्यम्सन (२४), कायले जेमिसन (५), टिम साऊदी (४) या तिघांनाही पायचीत पकडले. हेन्री निकोल्सला (१) अक्षर पटेलने आणि टॉम ब्लंडेलला (२) अश्विनने तंबूत पाठवले. त्यामुळे न्यूझीलंडची ९ बाद १५५ धावा अशी तारांबळ उडाली; परंतु रचिन-एजाझ या अखेरच्या जोडीने ५२ चेंडू खेळून काढल्याने भारताचा विजय निसटला.
दरम्यान या सामन्यात रविचंद्रन अश्विनने (४१९) भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले.तर
श्रेयस अय्यर हा पदार्पणाच्या कसोटीत सामनावीर पुरस्कार पटकावणारा सातवा भारतीय खेळाडू ठरला.
महत्त्वाच्या बातम्या:
- महापौर किशोरी पेडणेकरांनी मध्यरात्री अचानक मुंबई विमानतळाला भेट देत केली पाहणी
- ‘कृषी कायद्यांबाबत चर्चा करायला सरकार घाबरतंय’
- देवोलिना भट्टाचार्जीवर भडकला सलमान खान, म्हणाला….
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- पालकमंत्री सुभाष देसाईंचा निधी वाटपात अन्याय; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बाळासाहेब थोरातांकडे तक्रार!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<