भारत – नेपाळ मधील मैत्रीने चीनचा जळफळाट

बीजिंग : आर्थिक मदत पुरवून नेपाळशी जवळीक वाढवण्याचा व चीनपासून त्यांना तोडण्याचे स्वप्न भारताने पाहू नये, असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समधील लेखात म्हटले आहे. आर्थिक मदत पुरवून नेपाळशी संबंध अधिक सुधारण्यासाठी आम्ही पाऊल उचलले तर त्याने भारताचे नुकसानच होईल, असे त्यात म्हटले आहे.

भारत-चीनमधील डोकलाम तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमची तटस्थ भूमिका कायम ठेवणार आहोत, असे नेपाळकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारताची अर्थव्यवस्था चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या २० टक्के इतकीच आहे. नेपाळला प्रभावित करण्यासाठी भारताला आपल्या मित्र राष्ट्राला आर्थिक मदत पुरवायची असल्यास खुशाल पुरवावी. त्याने भारतातील लोक चीनी सामग्रीची खरेदी करू शकतील व चीनलाच फायदा होईल, असेही लेखात म्हटले आहे.