भारताला विजयासाठी 229 धावांची गरज 

India wwc

वेबटीम : भारतीय महिला संघाला विशवविजेता होण्यासाठी 229 धावांची गरज आहे . क्रिकेट ची पंढरी समजल्या जाणाऱ्या ‘लॉर्डस’ मैदानावर सुरु असलेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड च्या संघाने निर्धारित ५० षटकांत 7 बाद २२८ धावा पटकावल्या. ४७ धावांची सलामी देत यजमान इंग्लंड संघाने सावध सुरवात केली पण १२ व्या षटकात पूनम यादव ने लॉरेन विनफील्ड ला बाद करून भारतीय संघाला पाहिलं यश मिळवून दिल .

एकेकाळी इंग्लंड चे ६३ धावांवर ३ फलंदाज बाद झाले होते त्यानंतर सारा टेलर आणि नटाली स्कीव्हर यांनी अनुक्रमे ४५ आणि ५१ धावांची खेळी केली आणि संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला . पण ३३ व्या षटकात झुलन गोस्वामी हिने सारा टेलर आणि फ्र्यान विल्सन यांना चौथ्या आणि पाचव्या चेंडूत तंबूत धाडल आणि यजमान संघाला अडचणीत आणल . झुलन ने आपल्या १० षटकांमध्ये ३ फलंदाजांना तंबूत धाडल याव्यतिरिक्त  भारतातर्फे पूनम यादव २ , राजेश्री १ , यांना विकेट घेतल्या . आता भारत इतिहास रचण्यापासून फक्त 229 धावा दूर आहे .