त्रिपुरा विधानसभेत पहिल्यांदाच गायलं गेलं राष्ट्रगीत

tripuraa rashtrgeet

टीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरामध्ये डाव्यांच्या गडाला सुरुंग लावून सत्तेत आल्यानंतर शुक्रवारी एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशी घटना त्रिपुरा विधानसभेत पहायला मिळाली. भारतीयांच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या राष्ट्रगीताचे सूर त्रिपुरा विधानसभेत पहिल्यांदाच ऐकायला मिळाले.

भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर सभागृहाच्या पहिल्या सत्राची सुरुवात उत्सहात झाली. कामकाज सुरु होण्याआधी सगळे आमदार सभागृहात 11 वाजता पोहोचल्यानंतर राष्ट्रगीताला सुरुवात झाली. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्व मंत्री, सभागृहाचे सदस्य, अधिकारी, पत्रकार आणि प्रेक्षक उभे राहिले. विशेष म्हणजे राष्ट्रगीत लावण्याआधी विरोधकांसोबत चर्चा केली नव्हती,असं म्हणत सीपीएमचे आमदार बादल चौधरी यांनी आक्षेप घेतला आहे. विधानसभेत राष्ट्रगीत लावण्याची ही पहिलीच वेळ होती.प्रत्येक दिवशी राष्ट्रगीत लावण्याचा प्रयत्न करेन,असं सभागृहाचे सचिव बामदेव मजुमदार यांनी सांगितलं.

बऱ्याच मंडळींना यात विशेष काहीच नाही असं वाटू शकतं मात्र भारतीयांचा अभिमान,स्वाभिमान आणि अस्मितेचं प्रतिक म्हणून मान्यता असलेलं राष्ट्रगीत आजपर्यंत का गायलं गेलं नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.Loading…
Loading...