fbpx

न्यूझीलंडमध्ये भारताने केली विजयी सुरवात, धवनचे २६ वे अर्धशतक

टीम महारष्ट्र देशा : नेपियर येथे झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारताने मालिकेतील पहिला सामना जिंकून न्यूझीलंड येथे देखील विजयी सुरवात केली आहे. हा सामना भारताने ८ गडी राखून जिंकला असून भारतीय गोलंदाजां पाठोपाठ फलंदाजांनी देखील त्यांची भूमिका चोख बजावली आहे. या सामन्यात यजमान न्यूझीलंडने भारताला १५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण भारताने हे लक्ष्य अगदी सहजच गाठले.

न्यूझीलंडला अवघ्या १५७ धावांचा पाठलाग करण्यासाठी शिखर धवन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली पण रोहित शर्मा लवकरच केवळ ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करून भारताला विजयाच्या जवळ नेले. अर्धशतकाच्या जवळ असतानाच विराट कोहली ४५ धावांवर झेल बाद झाला.त्यानंतर शिखर धवन याने एकदिवसीय क्रिकेटमधील २६ वे अर्धशतक करून नाबाद ७५ धावा अशी खेळी खेळली.

आजच्या या विजयाचे शिल्पकार मात्र गोलंदाज ठरले आहेत. मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी न्युझीलंडच्या धावसंख्येला चांगलाच स्पीडब्रेकर लावला होता. पण या प्रभावी गोलंदाजांसमोर कर्णधार केन विलियम्सनने एकाकी झुंज देत ६४ धावांची खेळी केली.

1 Comment

Click here to post a comment