भारताचा दारुण पराभव

blank
पुणे- ऑस्ट्रेलियाने 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात 333 धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टीव्ह ओकेफीच्या जाळ्यात पुन्हा एकदा भारतीय संघ अडकला आणि अखेरपर्यंत काही बाहेर पडू शकला नाही.
स्टीव्ह ओकेफीने दुसऱ्या डावातही तब्बल 6 बळी मिळवत सामन्यात 12 बळी घेतले. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताचा दुसरा डावही अवघ्या 107 धावांवर संपुष्टात आला आणि तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला. सलग 19 कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहणाऱ्या भारतीय संघाचा विजयी रथ ऑस्ट्रेलियाने रोखला.