fbpx

भारताची पाकिस्तानवर मात; अंधांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला

world cup 2018

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय संघाने पाकिस्तानचा दोन विकेट्सनी पराभव करून, अंधांच्या पाचव्या विश्वचषकावर कोरलं नाव, भारताने अंधांचा विश्वचषक जिंकण्याची सलग दुसरी वेळ आहे. पाकिस्तानने अंतिम सामन्यात विजयासाठी दिलेलं ३०८ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने दोन विकेट्स राखून पार केलं.

पाकिस्तानकडून बदर मुनीर याने सर्वाधिक ५७ तर रियासत खान ४८ आणि कर्णधार निसार अली याने ४७ धावांचे योगदान दिले. याच्या जोरावर पाकिस्तानने ३०८ धावांची मजल मारली. भारतीय संघाने हे आव्हान ४९ व्या षटकात पार केले. भारतीय संघ विजयाच्या समीप असताना पाकिस्तानने भारताचे तीन गडी लागोपाठ बाद केले.
त्यामुळे या सामन्यात रंगत निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर उर्वरित भारतीय फलंदाजांनी संयमीपणे फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. ४९ व्या षटकात वाईड बॉल सीमापार गेला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. भारताने सलग दुसऱ्यांदा अंध क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.