भारत 31 धावांनी पराभूत, विराटची झुंज अपयशी

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या हजाराव्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारताचा 31 धावांनी पराभव केला. आज सकाळी सामना जेव्हा सुरु झाला तेव्हा ८४ धावांची आवश्यकता होती आणि सामना जिंकण्याच्या अवस्थेत होता. परंतु प्रत्यक्षात संघाला पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने भारताचा दुसरा डाव 162 धावांवर आटोपत दमदार विजय मिळवला.

विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण करत कडवी झुंज दिली पण तो बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाचा स्तर कमी झाला. नंतर मोहम्मद शमी, इशांत शर्मा असे गडी बाद होत गेले आणि भारताचा डाव १६२ धावांवर आटोपता झाला. विराटची झुंज अपयशी ठरली आणि भारताचा पराभव झाला.

दरम्यान सामना सुरू होताच दिनेश कार्तिकला पहिल्याच षटकात अँडरसनने बाद केले आणि तिथून भारताची घसरण सुरू झाली. कर्णधार विराट कोहलीकडून क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले पण ५१ धावांवर गोलंदाज बेन स्टोक्सने त्याची विकेट काढली.

विराटपाठोपाठ मोहम्मद शमीदेखील बाद झाला. त्याचा बळीही बेन स्टोक्सनेच घेतला आणि भारता समोरील अडचणी वाढल्या. त्यानंतर इशांत शर्माची विकेट पटली. हार्दिक पंड्याही झेलबाद झाला आणि भारताचा डाव १६२ धावांवर आटोपला. इंग्लंडच्या गोलंदाजांमध्ये बेन स्टोक्सने चार गडी बाद करत इंग्लंडच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. इंग्लंडची ही एक हजारावी कसोटी होती.
दरम्यान, दुसऱ्या डावात इंग्लंडला भारताने १८० धावांत रोखले होते. पहिल्या डावातील १३ धावांची आघाडीमुळे इंग्लंडने भारतासमोर १९४ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ ७८ धावांत माघारी परतला. या वेळीही अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला विराट कोहलीने सावरले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने ५ बाद ११० धावा केल्या होत्या. परंतु विराटच्या विकेटने विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले.

 

धक्कादायक : बाद नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत