ठरलं तर मग… उपांत्य फेरीत भारत भिडणार ‘या’ संघाशी

पुणे : सामन्यांपूर्वी हेलखावे खाणाऱ्या इंग्लंडने अगोदर भारताला आणि काल न्यूझीलंडचा पराभव करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी थाटात गाठली. न्यूझीलंडने हा सामना १२० धावांनी गमावला असला तरी त्यांचाही उपांत्य प्रवेश जवळपास निश्‍चित झाला आहे. तर पाकिस्तानचेही आव्हान संपल्यातच जमा झाले आहे.

आयसीसीच्या नियोजीत वेळापत्रकानुसार गुणतालिकेतील अव्वल संघ हा उपांत्य फेरीत चौथ्या स्थानावरील संघाशी, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील संघ यांच्यात सामना होईल. त्यानुसार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हा पहिला उपांत्य सामना मँचेस्टर येथे होईल, तर भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा उपांत्य फेरीचा सामना बर्मिंगहॅम येथे होईल.

Loading...

जर अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्यास आणि दुसरीकडे भारताने विजय मिळवल्यास ही क्रमवारी बदलेल. भारत अव्वल स्थानावर जाईल आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यास. भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड असे उपांत्य फेरीचे सामने होतील.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले