भारत कोरोनाच्या स्टेज-३मध्ये गेला असण्याची शक्यता: कोरोना टास्क फोर्स संयोजक डॉक्टरचा दावा

टीम महाराष्ट्र देशा – ‘हो भारत आता कोरोनाच्या स्टेज-३ मध्ये आहे असे आपण म्हणू शकतो. अधिकृतरित्या आपण जरी हे घोषित केलं नसलं तरी आपण आता स्टेज-३मध्ये आलो आहोत. असा दावा कोरोना टास्क फोर्स हॉस्पिटल संयोजक असलेले डॉक्टर गिरीधर ग्यानी यांनी ‘द क्विंट’ या वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

स्टेज-३  म्हणजे समुदायिक प्रसार. कोरोना प्रसारा दरम्यान हा सर्वात कठीण टप्पा मानला जातो. स्टेज-३मध्ये, साथीचा रोग लवकर पसरतो, कारण या टप्प्यात प्रसाराचा मूळ स्रोत शोधणे कठीण होते. तसेच डॉ. ग्यानी  म्हणाले की, कोरोना साथीचं नियंत्रित करण्यासाठी पुढील ५ ते १० दिवस महत्त्वपूर्ण ठरतील कारण आतापर्यंत बाधित परंतु ज्यांच्यात लक्षणं दिसून आलेले नाहीत त्यांच्यात या काळात लक्षणे दिसू लागतील.

असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हाईडर्सचे संस्थापक असलेले डॉ. ज्ञानी २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सचा भाग होते. कोविड -१९ रुग्णालयांवरील ही टास्क फोर्स नीती आयोगाच्या नेतृत्वात देशातील कोरोनव्हायरसच्या उद्रेकाविरुद्ध लढा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या काही टास्क फोर्सपैकी एक आहे.

डॉ. ग्यानी हे इंजिनिअर असून त्यांनी गुणवत्ता व्यवस्थापनात पीएचडी केली आहे. त्याची स्वयंसेवी संस्था – असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हाईडर्स – आरोग्य सेवेच्या संदर्भात सरकारला धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सक्रियपणे सल्ला देते.

‘आमच्याकडे अद्याप पुरेसे प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि कोविड -१९ रुग्णालये नाहीत, तसेच कोविड -१९ रुग्णालये तयार करण्यासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ आहे कारण येत्या आठवड्याभरात भारतात कोणत्याही दिवशी कोरोनाचा विस्फोट होऊ शकतो.’ असे डॉक्टर ग्यानी म्हणाले.

सरकारकडे पुरेशी चाचणी किट नाहीत

सरकार सध्या खोकला, श्वासोच्छवासाची समस्या, ताप ही तीनही लक्षणे असलेल्या लोकांचीच तपासणी करीत आहे. जर रुग्णाला या लक्षणापैकी एकच लक्षण असेल तर मग त्यांची चाचणी केली जात नाही. ” यात बदल करणे आवश्यक आहे. डॉ. ज्ञानी यांनी निदर्शनास आणून दिले की सरकारने आपली रणनीती बदलण्याची गरज आहे. ‘कोरोनाची साखळी तोडण्याबाबत आपण गंभीर असू तर सर्वच लक्षणे दाखवणाऱ्यांची चाचणी केली पाहिजे.’

२५  मार्चपर्यंत सरकारने देशात ११८ चाचणी प्रयोग शाळांची स्थापना केली आहे. सर्व मिळून त्यांच्यात दररोज १५००० चाचण्या घेण्याची क्षमता आहे तर इतर १६ खासगी लॅबसुद्धा कार्यरत केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासगी रुग्णालयांच्या मदतीने सरकारी रुग्णालयांना कोविड -१९  रुग्णालयांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यायोगे वैद्यकीय उपकरणे व प्रशिक्षित डॉक्टर आणि औषधे यांचा पुरवठा करता येईल.

‘माझ्या समोर पहिले आव्हान हे आहे की प्रथम आपल्याला कोविड -१९ रुग्णालये निश्चित करायची आहेत  आणि त्यानंतर परिचारिका, डॉक्टर आणि सहकारी यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. काही वैद्यकीय महाविद्यालये वसतिगृह रिकामे करण्यास सांगण्यात आले आहेत.या बाबतीत पंतप्रधान म्हणाले की ‘असे न करता, अंतिम वर्षाचे विद्यार्थी तिथेच राहिले पाहिजेत जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांची मदत होऊ शकेल. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिले जावे आणि कोव्हीड -१९ रुग्णालयात त्यांची मदत घेतली जावी’

भारतात किती रुग्णालये आवश्यक आहेत?

समजा, दिल्लीची लोकसंख्या ३ कोटी आहे. आम्ही म्हटले आहे की कमीतकमी ३००० बेडस तयार ठेवाव्यात आणि ज्यांना वेगळ ठेवणे आवश्यक आहे किंवा कोरोनव्हायरस संसर्गातून बरे झाले आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र कोविड -१९ केंद्रे देखील आवश्यक असतील. गेस्ट हाऊस आणि वसतिगृहे यांचा उपयोग करून अशी केंद्रे बनविली जाऊ शकतात.

गावे व लहान शहरे हाताळण्याची सरकारची योजना कशी आहे?

उत्तर प्रदेशातील बिजनौरसारख्या ठिकाणी, लोकसंख्या लक्षात घेऊन ६०० बेडची आवश्यकता असेल. परंतु तेथे ६०० खाटांची कोणतीही रुग्णालय नाही केवळ लहान रुग्णालये अस्तित्त्वात आहेत. म्हणून बरीच लहान रुग्णालयांचं एकत्रीकरण  कराव लागेल आणि रुग्णांना स्थलांतरित करण्यासाठी वाहतुकीची योग्य व्यवस्था केली जाईल याची काळजी घ्यावी लागेल. हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि मी केलेल्या शिफारसींपैकी ही एक आहे.

तुम्हाला वाटत नाही का की वेळ खरोखरच खूप कमी आहे?

पंतप्रधानांना बैठकीत मी असेच बोललो. असं डॉ. ग्यानी म्हणाले.

हेही पहा –