इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत पिछाडीवर 

4g internet speed

टीम महाराष्ट्र देशा: भारतात सध्या ५जी सुरु होणार असल्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत. अवघ्या काही सेकंदात चित्रपट डाऊनलोड होणार असल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत. पण ही बातमी ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की, भारत हा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत कमालीचा मागे आहे.
एका इंटरनेट स्पीड चेक करणाऱ्या कंपनीच्या अहवालानुसार मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबत भारताचा जगात 109वा क्रमांक तर ब्रॉडबॅडबाबत 76वा क्रमांक लागतो. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईल नेट स्पीडबाबत भारत शेजारच्या पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका यांच्यापेक्षा मागे आहे. या तिन्ही देशातील इंटरनेटचे स्पीड भारतापेक्षा अधिक चांगले असल्याची माहिती आहे.
भारतात 2017च्या सुरूवातीला सरासरी मोबाईल डाऊनलोडचे स्पीड 7.75 एमबीपीएस होते. या वर्षाच्या अखेरीस त्याचा वेग 8.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. तरीदेखील भारतात इंरटनेटच्या वेग वाढत आहे ही, चांगली बाब आहे. मात्र जगभरातील अव्वल नेट स्पीडच्या यादीत पोहोचण्यासाठी भारताला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा हे मात्र नक्की आहे.