भारत आमच्यावर मिसाईल हल्ला करणार आहे,आम्हाला वाचवा : पाकिस्तान

 टीम महाराष्ट्र देशा : भारत  आणि पाकिस्तान मध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या होणाऱ्या कारवायांमुळे दोन्ही देशांच्या सीमा लागत भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून खोट्या बातम्यांना उधाण आल आहे. भारत येत्या काळात आपल्यावर मिसाईल हल्ला करणार आहे अशी खोटी बातमी पाकिस्तान पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.
भारत आमच्यावर मिसाईल हल्ला करणार आहे,आम्हाला वाचवा असं सांगत काही राष्ट्रप्रमुखांना आपल्या बाजूने करण्याचा देखील पाकिस्तान कडून प्रयत्न होत आहे. तर पाकिस्तान कडून बुधवारी भारताच्या पाकिस्तान कडून बुधवारी सकाळी वायुसेनेच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्यात आली. त्यावेळी पाकिस्ताने F16 या विमानाचा वापर करण्यात केला होता. पाकिस्तानने केलेल्या या घुसखोरीला भारताच्या सतर्क असलेल्या लष्कराने परतवून लावले. तर पाकिस्तानकडून देखील भारताचे मिग 21 हे विमान पाडण्यात आल असून भारताचा एक वैमानिक देखील पाकिस्तानच्या ताब्यात आहे.
आता आलेल्या माहिती नुसार भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला उद्या  सोडण्यात येणार आहे. अशी माहिती  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चेची तयारी दाखवल्याचंही पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने भारताला कळवलं आहे. मात्र विंग कमांडरच्या सुटकेसाठी कुठलीही सौदेबाजी चालणार नसल्याचं भारत सरकारनं ठणकावलं आहे.