fbpx

१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य..! या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, हे माहीत नाही असा भारतीय शोधून सापडणार नाही; परंतु असा भारतीय सापडला असून तो ना अशिक्षित कामगार आहे, ना मनोरुग्ण तर त्या आहेत भाजपच्या मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता. नुकताच स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा थक्क करणारा शोध लावला आहे.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मीरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना त्यांनी आजच्याच दिवशी १९९७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचं सांगितले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे भाषणाचा कागद त्यांच्या समोर असताना सुद्धा अशी अक्षम्य चूक त्यांच्याकडून झाली. हे पाहून उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला.

त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार नरेंद्र मेहता यांनी ही चूक सुधारण्याऐवजी या वक्तव्यावर टाळ्या वाजवल्या. या मनोगतात त्यांनी अनेक चूका केल्या परंतु भाजपचे आमदार व समर्थक यावेळी गप्प राहिल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजप लोकप्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाबाबत इतकी मोठी चूक करणार असतील तर देशप्रेमाचा ठेका नक्की भाजपकडे आहे का.? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे.

अर्थात मिरा भाईंदरमध्ये अशा प्रकारच्या चुका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही भाजपचे नगरसेवक आनंद मांजरेकर यांनी मिरारोड येथील वीरपुत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याच्या वृत्तानंतरही त्यांच्या घराशेजारील शाळेच्या जागेत दणक्यात आपला वाढदिवस साजरा केला होता. त्या वेळी डिंपल मेहता आणि नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीमुळे मिरा भाईंदरकरांनी त्यांच्यावर कडाडून टीका देखील केली होती.

देशाची फाळणी नेहरू आणि पटेलांमुळेच

पिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक