डब्ल्युटीसी फायनलमध्ये १८ वर्षांचा बदला घेण्याची भारताला संधी

मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.

या स्पर्धेआधी आयसीसीच्या स्पर्धेत भारताने न्युझीलंड विरुद्ध अखेरचा विजय हा २००३ च्या विश्वचषकात मिळवला होता. यानंतर भारताना न्युझीलंडविरुद्ध सतत अपयश आले आहे. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने न्युझीलंडला ७ गडी राखुन पराभव केले होते. यानंतर २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ जगज्जेता ठरला होता. मात्र या स्पर्धेतील एकमेव सामना भारताने न्युझीलंडविरुद्ध १० धावांनी गमावला होता. यानंतर २०१६ टी-२० विश्वचषक स्पर्धेत ४७ धावांनी पुन्हा न्युझीलंडविरुद्ध पराभुत झालो होतो. तर डब्ल्युटीसी स्पर्धेतील कसोटी मालिकेतही भारताला २-० असा पराभव स्विकारावा लागला. तर २०१९ विश्वचषक स्पर्धेतील भारताचा संघाचा पराभव क्रिकेट रसिक आजही विसरु शकले नाही.

डब्ल्युटीसी सामन्यात भारतीय संघाला न्युझीलंडचा सामना करायचा आहे. मागील १८ वर्षापासुन जेव्हा आयसीसीची कोणतीही स्पर्धा येते तेव्हा न्युझीलंड संघाविरुद्ध भारताला कायम हार पत्कारावी लागली आहे. मात्र आता डब्ल्युटीसी सामन्यात भारतीय संघ १८ वर्षे पराभवाची साखळी तोडतो का न्युझीलंडचा संघ भारताविरुद्ध विजयरथ कायम राखतो याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना लागली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP