भारताला जे स्वातंत्र्य मिळालंय ती सुद्धा कॉंग्रेसचीचं देण आहे : रितेश देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकामंवर टीका करण्यात मागे-पुढे पाहत नाहीत. अभिनेता रितेश देशमुख याने. भारताला जे स्वातंत्र्य मिळालंय ती सुद्धा कॉंग्रेसचीचं देण आहे हे लक्षात ठेवा असे म्हणत भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

अभिनेता रितेश देशमुख याने कॉंग्रेसचे गुणगान गाताना यावेळी म्हटले की, तुमच्या खिशातला जो फोन आहे ती कॉंग्रेसची देण आहे, एवढेच नाही तर तुम्ही जे फेसबुक, कॉम्पुटर तुम्ही वापरताय ते सुद्धा कॉंग्रेसमुळेच आणि भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे सुद्धा काँग्रेसची देणं आहे हे लक्षात ठेवा. पुढे जाऊन मोदींच्या केलेल्या ५६ इंच छाती या वक्तव्याची खिल्ली उडवताना ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं असा टोलाही रितेशन भाजपा ला लगावला.