भारताकडून न्यूझीलंडला व्हाईटवॉश; टी२० मालिका ५-० जिंकली

टीम महाराष्ट्र देशा – ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या  टी-२० विश्वचषका आधी भारतीय संघाने नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. २०२० वर्षात आपला पहिला परदेश दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाने टी-२० मालिकेत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे.  रविवारी झालेल्या अखेरच्या टी-२० सामन्यात ७ धावांनी जिंकत भारताने ५-० च्या फरकाने मालिकेत बाजी मारली आहे.

या कामगिरीसह भारत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५ सामन्यांची मालिका व्हाईटवॉशच्या स्वरुपात जिंकणारा पहिला देश ठरला आहे. टीम इंडियाने या मालिकाविजयासोबत न्यूझीलंडसोबतचे मागिल सर्व हिशोब चुकते केले आहेत.

Loading...

या दौऱ्याआधी न्यूझीलंडच्या भूमीवर भारतीय संघाची टी-२० क्रिकेटमधली कामगिरी फारशी आश्वासक नव्हती. मात्र ५-० च्या फरकाने मिळवलेल्या विजयाच्या जोरावर भारताने जुना इतिहास पुसून टाकला आहे. तसेच मालिकेतील सर्व सामने जिंकत न्यूझीलंड संघावर वर्चस्व सिद्ध केले.

पाचव्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान यजमान संघाला पेलवलं नाही. रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतक झळकावत चांगले प्रयत्न केले, मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत न्यूझीलंड संघाच्या विजयाच्या आशा हिरावून घेतल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला. जसप्रीत बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले तर शार्दुल ठाकूरला मालिकावीर घोषित केले.

हेही पहा – 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार