भारताचा द. आफ्रिकेला व्हाईट वॉश, रांची कसोटीत डाव आणि २०२ धावांनी विजय

टीम महाराष्ट्र देशा – भारताने सांघिक कामगिरीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेवर रांची कसोटीत डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १३३ धावांत गुंडाळला. यामध्ये सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत पहिला डाव ९ बाद ४९७ धावांवर घोषित केला. यामध्ये सलामीवीर रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली. तसेच उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करत शर्माला चांगली साथ दिली. तर दक्षिण आफ्रिकेकडून लिंडा ने ४ गडी बाद केले.

Loading...

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात फलंदाजी करताना फक्त १६2 धावा केल्या, यात जुबेर हमजाने ६२ धावा केल्या. तसेच लिंडाने ३७ धावा केल्या. भारताकडून उमेश यादवने ३ तर शमी आणि नदीम यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर फॉलो ऑन मिळाल्यावर आफ्रिकेच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही चांगला खेळ करता आला नाही.

आफ्रिकन फलंदाजांनी दुसऱ्या डावात फक्त 133 धावा केल्या. भारताकडून शमीने ३ तर उमेश यादव आणि नदीमने 2 आणि अश्विन आणि जडेजा यांनी १ बळी घेतला. पाहिला डावात फलंदाजांनी आणि दोन्ही डावात गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारताला विजय मिळवणे शक्य झाले.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?