रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताचा न्यूझीलंडविरुद्ध आज पहिला कसोटी सामना

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताचा न्यूझीलंडविरुद्ध आज पहिला कसोटी सामना

Ajinkya Rahane

कानपूर : आजपासून मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane)नेतृत्वाखाली भारताचा (India)न्यूझीलंडविरुद्ध (New-Zealand)आज पहिला कसोटी सामना होणार आहे. रोहित शर्माच्या (rohit sharma)नेतृत्वाखाली भारताने नुकताच झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळविला आहे. त्यामुळे आता रहाणेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

विराट कोहलीच्या (virat kohali)अनुपस्थितीत हा पहिला कसोटी सामना आज होणार आहे. अजिंक्य रहाणेसाठी गुरुवारपासून सुरू होणारा न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना कौशल्याची दुहेरी कसोटी पाहणारा ठरणार आहे. भारताचे यशस्वी नेतृत्व करण्याबरोबरच फलंदाजीतही छाप पाडण्यास रहाणे उत्सुक आहे.दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा विचार करता रोहित, ऋषभ पंत, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. के. एल. राहुल दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार असून कोहली दुसऱ्या कसोटीसाठी संघात दाखल होईल. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या अनुभवी आणि युवा खेळाडूंचा रहाणे कशाप्रकारे मेळ साधणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

तर रोहित-राहुल यांच्या अनुपस्थितीत मयांक अगरवाल(mayank agrawal)-शुभमन गिल (shubhman gil)ही युवा जोडी सलामीला येईल. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, रहाणे, श्रेयस आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा असा भारताचा फलंदाजी क्रम असू शकतो. दरम्यान रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने चार कसोटी सामने जिंकले आहेत, तर एक लढत अनिर्णित राहिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला नमवल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथे भारताने रहाणेच्या नेतृत्वाखाली यश मिळवले आहे.

महत्वाच्या बातम्या