Share

T20 World Cup | टी 20 वर्ल्ड कपमध्ये तीनदा आमने-सामने आले आहे भारत-इंग्लंड

टीम महाराष्ट्र देशा : आज 10 नोव्हेंबर 2022 रोजी भारत (India) आणि इंग्लंड (England) या दोन्ही संघांमध्ये टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना (Semi Final) पार पडणार आहे.टी 20 विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान (Pakisthan) आणि न्यूझीलंड (Newzealand) यांच्यामध्ये झाला असून पाकिस्तान हा सामना जिंकून अंतिम फेरीसाठी (Final) पात्र ठरला आहे. तर, आता 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानचा सामना उपांत्य फेरीतील दुसऱ्या विजेत्याशी होईल. तर त्याआधी ॲडलेड ओव्हलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा उपाध्य फेरी सामना होणार आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

भारतीय संघाने 2007 मध्ये शेवटचा टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारतीय संघाला हा दुष्काळ लवकरच संपवून यावर्षी कप आपल्या नावावर करायचा आहे. त्यामुळे भारतीय संघ पूर्ण जोर लावून आजचा सामना जिंकण्याच्या तयारीत आहे. भारताचा आजचा सामना इंग्लंड विरुद्ध होणार असून याआधी देखील भारत आणि इंग्लंडने 3 सामने खेळले आहे.

भारत आणि इंग्लंड यांनी आतापर्यंत एकूण 22 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. तर यामध्ये भारताने 22 सामने जिंकले असून इंग्लंडने 10 सामने जिंकले आहेत. 2022 मध्ये झालेल्या टी 20 आंतरराष्ट्रीय मालिकेमध्ये भारतीय संघाने इंग्लंड संघावर 2-1 असा विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या या सामन्यामध्ये भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.

टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत एकूण 3 सामने झाले आहेत. या 3 सामन्यामधील भारताने 2 सामने जिंकले आहेत. 2007 मध्ये झालेल्या विश्वचषक दरम्यान मध्ये भारत आणि इंग्लंड मध्ये पहिला सामना झाला होता. तर भारताने 18 धावांनी हा सामना जिंकला होता. यात सामन्यादरम्यान, युवराज सिंगनेस स्टुअर्ट ब्रँडवर 6 षटकार मारत 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. तर 2009 मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये इंग्लंडने भारतावर 3 धावांनी विजय मिळवला होता. 2012 मधल्या विश्वचषक सामन्यांमध्ये हे दोन्ही संघ शेवटचे आमने-सामने आले होते. या सामन्यांमध्ये भारताने 90 धावांनी इंग्लंडवर विजय मिळाला होता.

महत्वाच्या बातम्या 

 

टीम महाराष्ट्र देशा : आज 10 नोव्हेंबर 2022 रोजी भारत (India) आणि इंग्लंड (England) या दोन्ही संघांमध्ये टी 20 विश्वचषक …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now