भारताने लहान मुलांसाठी जगात पहिली डीएनए आधारित लस तयार केली; मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर गेले आहेत. ते तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश असलेल्या क्वाड परिषद झाल्यानंतर मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची देखील काल भेट घेतली. दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत मोदी यांनी आज भाषण केले.

यावेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षासह कोरोना महामारी, आंतरराष्ट्रीय प्रश्न, आतंकवाद, भारताचे महत्व अशा विविध विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, कोरोना महामारीतून जग आता सावरू लागले असून अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. भारत देखील लसीकरणात अग्रेसर आहे. तर लहान मुलांसाठी देखील लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. पालक हे चिंतीत असून कोरोनाचा धोका कमी व्हावा यासाठी लहान मुलांचे देखील लसीकरण लवकरात लवकर व्हावे अशी मागणी करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज भाषणातून मोठी घोषणा केली आहे. भारत ‘सेवा परमो धर्मा’अंतर्गत लसीकरण करण्यात गुंतलेला आहे. भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली आहे. खासकरून ही लस १२ वर्षांपुढील लहान मुलांसाठी बनवण्यात आली आहे. येत्या काळात ही लस देण्यात येईल. तसेच भारताने पुन्हा एकदा जगाला लस पुरवण्यास सुरुवात केली आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या