ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेतच्या उपांत्यफेरीत भारताचा पराभव

chese

नवी दिल्ली : ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेल्या फिडे ऑलिम्पियाड बुद्धीबळ स्पर्धेत भारताला उपांत्यफेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी भारताने संयुक्तपणे विजेतेपद मिळवले होते. मात्र या वर्षी त्यांना अंतिम सामनाही गाठता आला नाही. अमेरिकन संघाने भारताचा पराभव केला आहे.

साखळी गटात कामगिरी केल्यानंतर भारतीय बुद्धिबळ संघ जेतेपद पुन्हा राखेल अशी अपेक्षा सर्वाना होती. उपांत्य फेरीच्या पहिल्या डावात भारताने अमेरिकेला ५-१ ने गार केले. अमेरिकेने दुसऱ्या डावात ४-१ करत लढत बरोबरीत आणली. निर्णयाक लढतीत मात्र अमेरिकन संघाने भारताचा ४.५-१.५ च्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. विजेता ठरवण्यासाठी झालेल्या जलद लढतीत भारताचे बुद्धिबळपटू पी. हरिकृष्णा, बी. अधिबन, कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली हे बुद्धिबळपटू यांना पराभवाचा सामना करावा लागला. ज्यामूळे वि. आनंद यांच्या मार्गदर्शनात खेळलेल्या भारतीय संघाचे पुन्हा विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने रशियाबरोबर संयुक्त जेतेपद मिळवले होते. भारताचा या वर्षी पराभव झाला आहे. तर रशियाने पुन्हा अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत आता अमेरिका विरुद्ध रशिया असा अंतिम सामना रंगणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या