हिंदुस्तान हा मुस्लिमांचा आहे : औवेसी

asaduddin-owaisi

औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात एमआयएम प्रमुख असउद्दीन औवेसी यांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली ते म्हणाले मोदींना मुस्लिम महिलांना न्याय द्यायचा नसून त्यांच्या डोळ्यात शरीयत सलत आहे. आमचे पंतप्रधान मुस्लीम महिलांच्या न्याय हक्काच्या गोष्ट करतात पण त्या हिंदू महिलांच काय ज्यांना नवऱ्याने टाकून दिलं आहे त्यांच्याकडे मोदी कधी लक्ष देतात का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ते समोर म्हणाले, मोदी तुम्हाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर ज्या व्यक्तीने आपल्या पत्नीला ट्रीपल तलाक ने तलाक दिला. त्या व्यक्ती ने आपल्या पत्नीला दरमाह १५ हजार रु पोटगी म्हणून द्यावे असा कायदा करा. आज देशात कायदा कोणता हवा याच सुद्धा तुम्हाला ज्ञान नसावं का ? आज भारत देशात २५ लाख अशा महिला आहेत ज्यांना त्यांचे पती सांभाळत नाही ज्यात २२ लाख हिंदू महिला आहेत तर २ लाख मुस्लिम महिला आणि ९० हजार इसाई महिला आहेत यात जास्त तर हिंदूंच्या महिला आहेत त्यांचं काहीतरी बघा मोदी! असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मोदींना लोकसभेत म्हटलं होत. ‘आमच्या गुजरात च्या वहिनी पण या २२ लाख महिलात येतात निदान त्यांच्याकडे तरी लक्ष द्या’ तसेच मुस्लिम समाजातील युवकांनी जर कोणी मुस्लिम ट्रिपल तलाक देत असेल तर त्याला समाजातुन बहिष्कृत करा. असे आवाहन केले.

Loading...

मुस्लिम समाजातील महिलांना त्यांनी आर्त हाक दिली ते म्हणाले मी माझ्या बहिणी ला विचारतो की तुम्ही माझी साथ द्या, तुम्ही तीन तलाक बंदी कायद्याच्या विरोधात उभ्या राहा, मी तुमच्या हक्कासाठी लढत आहे.मोदींनी लक्ष करत ते पुढे म्हणाले पंतप्रधान साहेब तुमचे लक्षण ठीक नाहीत मोदी साहेब हा देश मुस्लिमांचा आहे, तुम्ही ज्याला बाराशे वर्षाची गुलामी म्हणतात ना त्या हुकुमातीबद्दल मला अभिमान आहे ती आमचे पूर्वजांनी गाजवलेली आहे. हा देश मुस्लिमांचा आहे कारण हाजारते आझम यांनी याच देशात पाहिलं पाऊल ठेवलं होतं आणि ते आमचे बाप आहेत आणि बापाची संपत्ती लेकाची असते ४ टक्के राजपूत लोक जर पद्मावती बंद करू शकतात आणि मुस्लिम १४ टक्के असूनही हतबल आहे ज्यांच्या जवळ ताकत आहे ते मान्य करन घेतात आणि आपण १४ टक्के आहोत आपण हतबल झालो.

यावेळी भीमा कोरेगाव च्या विषयाला हात घालताना औवेसी म्हणाले की तुम्ही भिडे आणि एकबोटेला का अटक करत नाहीत कारण तुम्हाला या देशातील दलित संपवायचे आहेत. तुम्हाला मुस्लिम संपवायचे आहे मुळात तुम्हाला काँग्रेस मुक्त भारत नाही करायच. तर तुम्हाला मुस्लिम मुक्त भारत करायचा आहे असा आरोप यावेळी औवेसी यांनी केला.या साठी मुस्लिम तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे आज हिंदुत्व हे भारताच्या डोक्यावर आहे त्याला खाली खेचण्यासाठी नवीन राजकीय ताकत उभी राहायला हवी असा संदेश त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी दिला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले