त्यांना आधी तुमची आवडती महिला क्रिकेटपटू कोण हे विचारा – मिताली राज

भारतीय महिला संघाने काल श्रीलंका संघाचा सराव सामन्यात पराभव करून आयसीसी विश्वचषक स्पर्धेला विजयी सुरुवात केली. भारतीय संघाने कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळविला. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा मिताली राजला प्रश्न करण्यात आला की तुझा आवडता क्रिकेटपटू कोण?

यावर मिताली राजने क्षणाचाही विलंब न करता त्या पत्रकाराला प्रतिप्रश्न केला, “आधी तुम्ही त्या क्रिकेटपटूंना विचारा त्यांची आवडती महिला क्रिकेटपटू कोण? ”
पुढे मिताली असही म्हटली की, ” नेहमी पुरुषच असे प्रश्न मुलींना विचारतात का तुम्ही कधी पुरुष खेळाडूला तुझी आवडती महिला क्रिकेटपटू कोण आहे असंही विचारलय? नसेल तर आधी कृपया ते विचारा आणि मग मला हा प्रश्न करा.”