एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सलामी

आशुतोष मसगौंडे: काल किंग्समेड,डरबन येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर दक्षिण अफ्रीकेचा सहा गडी राखून पराभव केला.भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ४५.५ षटकात २७० धावांचे आव्हांन पूर्ण केले.

Screenshot (1) kohali

विराट कोहलीने ११९ चेंडूत ११२ धावांसह दक्षिण अफ्रीकेत एकदिवसीय क्रिकेटमधले पहिले शतक झळकावले.त्याचबरोबर अजिंक्य रहाणेने या विजयात ७९ धावांचे महत्वाचे योगदान दिले.या अर्धशतकासह रहाणेने भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमधे सलग पाच सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.विराट कोहलीने अशी कामगिरी दोन दोन वेळा केली आहे.

Screenshot (1) faf

त्यापूर्वी दक्षिण अफ्रीकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने कारकिर्दीतले ९ एकदिवसीय शतक करत दक्षिण अफ्रीकेला ८ बाद २६९ धावा ऊभारणीसाठी मदत केली.ऐकवेळी भारतीय फिरकीपटूंनी दक्षिण अफ्रीकेची ५ बाद १३४ अशी अवस्था केली होती.पण डू प्लेसिसने तळातील फलंदाजांना हाताशी घेत अफ्रीकेचा डाव सावरला.भारताकडून कुलदीप यादवने ३४ धावा देत ३ गडी तर यजुवेंद्र चहलने ४९ धावात २ गडी बाद केले.तसेच भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक बळी घेतले.या विजयासह भारताने दक्षिण अफ्रीकेचा एकदिवसीय क्रिकेटमधिल सलग सतरा सामन्यांचा विजयी रथ रोखला.

You might also like
Comments
Loading...