भुवीच्या घातक गोलंदाजीमुळे भारताचा श्रीलंकेवर पहिल्या टी-२०त ३८ धावांनी विजय

मुंबई : एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला आहे. भारताने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपुर्ण संघ १२६ धावांवर अटोपला. यासह भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघाला पाचारण केले. सामन्यातील पहिल्याच चेंडुवर पदार्पणवीर पृथ्वी शॉ भोपळा न फोडताच बाद झाला. यानंतर मधल्या फळीतील इतर फलंदाजानी केलेल्या फलंदाजीमुळे भारताने निर्धारीत २० षटकात ५ गडी गमावत १६४ धावांची मजल मारली. भारताकडून सुर्यकुमार यादवने ३४ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारासंह सर्वाधीक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर श्रीलंकेकडून दुष्मंथा चमिरा आणि वानिदुं हसरंगा या दोघांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपुर्ण संघ १२६ धावांवर अटोपला. यासंह भारताने पहिला टी-२० सामना ३८ धावांनी जिंकला. श्रीलंकेकडून चरिथ असलांकाने २६ चेंडुत ३ चौकार आणि ३ षटकारांसह सर्वाधीक ४४ धावांची खेळी केली. तर भारताकडून या डावात उपकर्णधार भूवनेश्वर कुमारने २२ धावांत सर्वाधीक ४ गडी बाद केले. त्यालाच सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या