कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा कॅनडावर १३-१ ने विजय

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा कॅनडावर १३-१ ने विजय

india vs canada

भुवनेश्वर : कनिष्ठ विश्वचषक हॉकी (Junior Hockey World)स्पर्धेत भारताने (India)‘ब’ गटातील लढतीत कॅनडाला(Canada) १३-१ असे पराभूत केले. उपकर्णधार संजयने साकारलेल्या सलग दुसऱ्या हॅट्ट्रिकला अरायजीत सिंग हंडलच्या (Arayjit Singh Handal)तीन गोलची उत्तम साथ मिळाली.

गतविजेत्या भारताला बुधवारी फ्रान्सने ५-४ असा पराभवचा धक्का दिला. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला कॅनडाविरुद्ध मोठय़ा फरकाने विजय गरजेचा होता. तर फ्रान्सने अन्य लढतीत पोलंडचा ७-१ असा धुव्वा उडवून सलग दोन विजयांसह पुढील फेरी गाठली आहे. आता शनिवारी पोलंडविरुद्ध भारताची लढत होणार आहे. यामध्ये भारताला विजय मिळवणे गरजेचे आहे.

दरम्यान भारताकडून या लढतीत संजयने अनुक्रमे १७, ३२ आणि ५९व्या मिनिटाला गोल केले. तर हंडलने ४०, ५० आणि ५१व्या मिनिटाला तीन गोल केले. या दोघांव्यतिरिक्त उत्तम सिंग (Uttam Singh)(३, ४७ मि.), शारदानंद तिवारी (Shardanand Tiwari)(३५, ५३ मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल साकारले, तर कर्णधार विवेक सागर प्रसाद (८ मि.) मणिंदर सिंग (२७ मि.) आणि अभिषेक लाक्रा (५५ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केले.

महत्वाच्या बातम्या: