रोहित शर्माची शानदार फटकेबाजी, भारताचा बांगलादेशवर ८ गडी राखून विजय

टीम महाराष्ट्र देशा – कर्णधार रोहित शर्माच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. त्याने ४३ चेंडूंत ८५ धावांची शानदार खेळी केली. त्याला शिखर धवनने ३१ धावा करत चांगली साथ दिली. त्यामुळे भारताने १५४ धांचे लक्ष सहज गाठले.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित २० षटकांत ६ बाद १५३ धावा केल्या. भारताकडून चहलने २ तर, सुंदर, चाहर, खलील अहमदने एक एक गडी बाद केला. तर बांगलादेशकडून नईमने ३६, सरकारने ३० तर लिटन दासने २९ धावांची खेळी केली.

त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ताबडतोब ८५ धावांची खेळी केली. तसेच शिखर धवनने ३१ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. हे दोघेही बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलने सहज संघाला विजयापर्यंत पोहोचवले.

दरम्यान, हा सामना जिंकत भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे हा सामना संघासाठी महत्वाचा होता. या सामन्यानंतर मालिकेला अंतिम सामना जिंकून मालिका जिंकण्याचा दोनही संघांचा प्रयत्न असणार आहे.

महत्वाच्या बातम्या