चक दे इंडिया! भारत ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये

लखनौ: भारतीय हॉकी टीमने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. भारतीय संघाने शूट आऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. शूटआऊटमध्ये ४-२ ने भारताने विजय मिळवला. गुरुवारी सामन्याच्या ५५व्या मिनिटांपर्यंत पिछाडीवर पडलेल्या भारताने दमदार पुनरागमन करीत स्पेनचा २-१ ने पराभव केला आणि ज्युनिअर हॉकी विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आता फायनलमध्ये भारतासमोर बेल्जियम संघ असणार आहे.

ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत यजमान भारताने स्पेनवर २-१ ने मात केली आहे. अटीतटीच्या झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत विजय मिळवत ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने मजल मारली होती.