भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

टीम महाराष्ट्र देशा : अॅॅडलेड येथे झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने दणदणीत विजय मिळविला आहे. दोन्ही आजी-माजी कर्णधारांच्या खेळीने भारताला या सामन्यात यश मिळाले आहे. कर्णधार विराट कोहलीने संयमी खेळी खेळत शतक केले तर धोनीने एक बाजू लाऊन धरत संघाला विजयाच्या जवळ नेले. हा सामना जिंकल्यामुळे 3 सामन्यांच्या मालिके मध्ये 1-1 अशी बरोबरी झाली असून पुढचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी रंजक ठरणार आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणे फेक जिंकून फलंदाजी निवडली व शॉन मार्शच्या दमदार शतकाच्या जोरावर भारतापुढे 299 धावांचे आव्हान उभे केले . पण भारताने हे आव्हान सहज पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या 299 धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीच्या जोडीने चांगली सुरवात केली पण मोठी धावसंख्या उभारण्यास ही जोडी काहीशी अपयशी ठरली. विराटच्या संयमी आणि सुसंगत खेळी मुळे मधल्या ओवर्समध्ये भारतीय डावाला स्थैर्य मिळाले. अंबाती रायडू च्या विकेट नंतर धोनी मैदानावर उतरला त्याने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने खेळला थोडीशी गती आणण्याचा प्रयत्न केला. कोहलीने 112 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 104 धावा केल्या शतक झाल्यावर मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली आउट झाला. त्यानंतर धोनीने 54 चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद 55 धावांची विजयी खेळी केली तसेच मी एक उत्तम फिनिशर हे पुन्हा सिद्ध केले.

Loading...

या सामन्यात रोहित शर्माने 43 धावा करत संघाला उत्तम सुरवात करून दिली तर शिखर धवन ने 32 धावा केल्या. तसेच अंबाती रायडू ने 25 , विराट कोहलीने 104 , दिनेश कार्तिक ने 25* आणि धोनीने 55* धावा केल्या. आज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पहिल्या सामन्या इतके यश संपादन करता आले नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील