गब्बर इज बॅक : मोठ्या खेळीसाठी शिखर उत्सुक

blank

टीम महाराष्ट्र देशा- भारत आणि बांगला देश यांच्यात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या 3 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज संध्याकाळी नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडीयम वर खेळला जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर भारताची ‘पर्याय शोधमोहीम’ सुरू असून, युवा खेळाडू संधीचे सोने करण्यासाठी, तर अनुभवी खेळाडू स्थान टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

विराट कोहलीने विश्रांती घेतल्यानंतर भारतीय संघाची सूत्रे रोहित शर्माकडे आली आहेत. शिखर धवन पुन्हा संघात परतला आहे. विजय हजारे करंडकमध्ये तो धावांसाठी संघर्ष करताना दिसून आला. त्याला सात सामन्यांत केवळ एकच अर्धशतक ठोकता आले. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने अनुक्रमे ३६ आणि ४० धावा केल्या. तर मधल्या फळीत लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, कृणाल पंड्या असणार आहेत. त्याचबरोबर अष्टपैलू शिवम दुबे याला पदार्पणाची संधी असल्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने दिले आहेत.

तर दुसऱ्या बाजूला ऋषभ पंतसोबतच टी-२० सीरिजसाठी विकेट कीपर संजू सॅमसनचीही निवड करण्यात आली आहे. मग संधी कोणाला मिळणार? असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. तेव्हा पंत अनुभवी आहे आणि त्याला संधी द्यायची गरज आहे. आमचे दोन्ही विकेट कीपरकडे प्रतिभा आहे. पण पंतने टी-२०मध्ये त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने फक्त १०-१५ मॅच खेळल्या आहेत, त्यामुळे त्याला आणखी संधी मिळाली पाहिजे. एवढ्या लवकर त्याच्याबद्दल मत बनवणं चुकीचं ठरेल, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.

महत्वाच्या बातम्या