भारत व श्रीलंका अंतिम कसोटी :ऐतिहासिक व्हाइटवॉश भारताचे लक्ष्य

स्वप्नील कडू: भारत व श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या व अंतिम कसोटी सामन्यास उद्यापासून सुरुवात होत आहे.पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे.
उद्याचा सामना पल्लेकलच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात जाडेजावर बंदी असल्याकारणाने त्याच्या जागेवर कुलदीप यादवला संधी मिळू शकते .श्रीलंका संघ दुखापतीमुळे त्रस्त असून त्यांचे रंगणा हेराथ व नुवाण प्रदीप हे आघाडीचे गोलंदाज अंतिम सामन्यात खेळू शकणार नाही.भारताकडे सध्या उत्कृष्ट राखीव खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत आहेत.राखीव खेळाडूंमध्ये रोहित भुवनेश्वर कुमार इशांत शर्मा अभिनव मुकुंद यांसारखे उत्तम खेळाडू भारताकडे आहेत त्यामुळे भारताला हा सामना जिंकून लंकेला ऐतिहासिक व्हाईटवॉश देण्याची संधी आहे.