अंडर-१९ विश्वचषक: ऊपांत्य सामन्यात भारत-पाक आमने सामने

टीम महाराष्ट्र देशा: न्यूजीलैंड येथे सुरू असलेल्या अंडर -१९ विश्वचषक स्पर्धेच्या ऊपांत्य पूर्व सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेश वर १३१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेश समोर २६५ धावांचे आव्हांन दिले होते. २६५ धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ ४२.१ षटकात सर्वबाद १३१ धावाच करू शकला.

नानेफेक जिंकून भारतीय कर्णधार पृथ्वी शाँ ने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी ऊत्कृष्ठ फलंदाजी करत बांग्लादेश समोर आव्हाणात्मक धावसंख्या ऊभी केली. ऊपकर्णधार शुभनम गिलने ९४ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. त्याचे हे स्पर्धेतील सलग तिसरे अर्धशतक होते. त्याचबरोबर शेवटच्या षटकांमधे अष्टपैलू अभिषेक शर्माने ४९ चेंडूत ५० धावांची खेळी केली.

२६५ धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशच्या डावाची संथ सुरूवात झाली. त्यानंतर ८ व्या षटकात बांग्लादेशने पहिला गडी गमावला व ठराविक अतंराने बांग्लादेशचे फलंदाज बाद होत गेले. भारताचा जलजगती गोलंदाज कमलेश नागरकोटीने १८ धावात तीन तर शिवम मावी आणि इशान पोरल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

या विजयाबरोबरच भारताने ऊपांत्य फेरीतले आपले स्थान पक्के केले. ऊपांत्य सामन्यात गरूवारी ३० जानेवारीला भारताला पारंपरिक प्रतीस्पर्धी पाकिस्तानशी सामना करावा लागेल.

You might also like
Comments
Loading...