जिल्हा परिषदेत होणार स्वतंत्र निविदा सेल

नाशिक  : जिल्हा परिषद प्रशासनाने स्वतंत्र निविदा सेल तयार करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्तावही तयार करण्यास सुरूवात केल्याचे समजते. या सेलमधून सर्वच विभागांच्या निविदा प्रसिध्द होणार असून तब्बल आठ कर्मचाऱ्यांचे काम यातून वाचणार आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघुपाटबंधारे अशा विविध विभागातील निविदा वेळेत प्रसिध्द होत नाही, निविदा हरवली अशी सदस्यांची ओरड असते. मात्र, यापुढे अशी ओरड ऐकू येणार नाही. जि.प. प्रशासनाने आता स्वतंत्र निविदा सेल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम, लघुपाबंधारे या विभागासह विविध विभागातील कामांच्या तसेच खरेदी-विक्रीच्या प्रसिध्द करण्यासाठी प्रत्येक विभागात एक टेबल व कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांकडून निविदा प्रसिध्द केल्याची कार्यवाही केली जाते. या टेबलावरील कर्मचाऱ्यांची बदली झाल्यास सदस्यांसह विभागप्रमुखांची ओरड सुरू होते. त्यामुळे टेंडर टेबलावर वर्षोनुवर्षे एकच कर्मचारी काम करत असताना दिसतात. एकच कर्मचारी असल्याने त्यांची मोनोपाळी तयार होत असल्याची तक्रार अनेकदा सदस्यांनी कडून सभागृहात होती. याचा परिणाम कामकाजावर होत असतो. या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी स्वतंत्र निविदा सेल कार्यरत करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. विविध विभागात निविदा प्रसिध्द करण्यासाठी १६ कर्मचारी सध्या कार्यरत आहे. मात्र, हा सेल निर्माण झाल्यास केवळ ८ कर्मचारी लागणार आहे. या सेल मधून सर्व विभागांमधील निविदा प्रसिध्द करण्याची कार्यवाही केली जाईल. यात वेळ अन कर्मचाऱ्यांची बचत होणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!