स्वातंत्र्यदिनानिमित्त ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेल्या शुभेच्छा प्रशंसनीय असून त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मी त्यांचा आभारी आहे, असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात सर्जिकल स्टाईक आणि वस्तू आणि सेवा कर विधेयकाबाबतही माहिती दिल्याचे सूत्रांकडून सांगण्य़ात आले.