fbpx

इंदापूर विधानसभेची निवडणूक आपणच लढवणार! हर्षवर्धन पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

ajit pawar vr harshvardhan patil

पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात इंदापूरच्या जागेवरुन अटीतटीचा सामना रंगला आहे. ”इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढवणार आहोत. आपल्या उमेदवारीची काळजी काँग्रेस पक्ष घेईल,” असे उत्तर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांना दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यात शेतकरी मेळाव्यात बोलतांना “आघाडी झाली नाही तरी चालेल पण इंदापुरची जागा सोडणार नाही ” असे वक्तव्य केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. कारण इंदापूरमधून कॉंग्रेसपक्षाकडून हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आमदार भरणे मामा यांचा आग्रह आहे. त्यामुळे इंदापूर मतदार संघात नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून इंदापूरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले होते.

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे उस्मानाबाद मध्ये बोलतांना म्हणाले होते. आघाडी बाबत म्हणाले, मागच्या विधानसभा निवडणुकीला कॉंग्रेस- राष्ट्रवादी वेगवेगळी लढली आणि भाजप-शिवसेना पण वेगवेगळी लढली. त्यामुळे विधानसभेचा जो निकाल बाहेर आला. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्ता मामा भरणे निवडून आले. त्यामुळे आघाडी ची जेव्हा चर्चा होईल तेव्हा तेव्हा स्थानिक जो आमदार ज्या पक्षाचा आहे. त्याला उमेदवारी द्यावीच लागेल. त्यामुळे अजित पवार यांनी इंदापूरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहणार असे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे इंदापूरचा वाद चांगलाच पेटला आहे. दरम्यान, ”आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी जे वक्तव्य केलं ते त्यांच्या पक्षाचं मत होतं, काँग्रेस पक्षाचं नव्हतं. जागा वाटपाची चर्चा अथवा धोरण वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे. ते फक्त एका इंदापूरच्या जागेपुरतं मर्यादित नसेल. ज्या त्या ठिकाणची परिस्थिती बघून ते निश्चित होणार आहे,” असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.