IND vs SL : लंकेचा धुव्वा उडवत भारताचा मालिका विजय; रचला नवीन इतिहास!

मुंबई: बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या डे नाईट कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा २३८ धावांनी पराभव केला. यासह भारताने आता दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असा क्लीन स्वीप केला आहे. घरच्या मैदानावर भारताचा हा सलग १५ वा कसोटी मालिका विजय आहे. यासह टीम इंडियाने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाने घरच्या मैदानावर इतक्या सलग कसोटी मालिका जिंकलेल्या नाहीत.

प्रथम फलंदाजी करताना भारताने २५२ धावा केल्या आणि त्यानंतर श्रीलंकेला पहिल्या डावात १०९ धावांत गुंडाळत १४३ धावांची आघाडी घेतली. यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ९ बाद ३०३ धावा करून डाव घोषित केला आणि श्रीलंकेसमोर ४४७ धावांचे लक्ष्य ठेवले, त्याला प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव तिसऱ्या दिवशीच २०८ धावांवर गडगडला. भारताकडून फलंदाजीत श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि ऋषभ पंतने (rishabh pant) अप्रतिम फलंदाजी केली आहे. तर गोलंदाजीत धुरा अश्विन आणि बुमराहने सांभाळली. ऋषभ पंतला शतक जरी करता आले नसले तरी त्याच्या धमाकेदार कामगिरीसाठी मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

रोहित शर्माने नव्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळताच भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरु आहे. २०२१/२२च्या मोसमात घरच्या मैदानावर भारत अजय राहिला आहे. यादरम्यान टीम इंडियाने चारपैकी तीन कसोटी सामने जिंकले आणि एक अनिर्णित राहिला. संघाने सलग तीन एकदिवसीय सामने आणि सलग नऊ टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही जिंकले आहेत.

महत्वाच्या बातम्या